Raigad News

Raigad News : कोकणकन्या एक्स्प्रेसखाली उडी घेऊन विवाहित महिलेची मुलीसह आत्महत्या; मैत्रिणीला पाठवलेल्या ‘त्या’ मेसेजमधून झाला खुलासा

590 0

रायगड : रायगड (Raigad News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये कोकण रेल्वेखाली उडी मारून एका महिलेने तिच्या दोन मुलींसह आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. माणगाव तालुक्यातील गोरेगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एका महिलेने तिच्या दोन मुलींसह कोकण कन्या एक्स्प्रेसखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या महिलेने आत्महत्येपूर्वी तिच्या मैत्रिणीला व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉइस मेसेज पाठवला होता. त्यात तिने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून दोन्ही मुलींसह आत्महत्या करत असल्याचे म्हटलं होते.

यानंतर मृत महिलेच्या मैत्रणीने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तिथे महिलेचा व तिच्या एका मुलीचा मृतदेह आढळून आला. तर दुसरी मुलगी अद्याप बेपत्ता असून तिचा मृतदेह हाती लागलेला नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shocking News : धक्कादायक ! खोकल्याचे औषध घेतल्याने 5 जणांचा मृत्यू

World AIDS Day : दरवर्षी 1 डिसेंबरलाच का असतो जागतिक एड्स दिन?

Satara News : इन्स्टाग्रामवरची खुन्नस रस्त्यावर निघाली; डॉल्बी स्पर्धेत बंदुका, तलवारी नाचवून तरुणांची हुल्लडबाजी

Datta Dalvi : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना जामीन मंजूर

Ajit Pawar : लोकसभेच्या ‘या’ जागा लढवणार; कर्जतच्या शिबिरात अजितदादांचं मोठं वक्तव्य

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!