बंगाल विधानसभेत टीएमसी आणि भाजप आमदारांमध्ये राडा, भाजपचे ५ आमदार निलंबित (व्हिडिओ)

182 0

कोलकाता- रामपूरहाट हिंसाचार आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सोमवारी पश्चिम बंगाल विधानसभेत भाजप आणि तृणमूल काँग्रेस आमदारांमध्ये प्रचंड राडा झाला. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा तणाव एवढा वाढला की, प्रकरण हाणामारी, लाथा-बुक्क्यांपर्यंत पोहोचले. याप्रकरणी भाजपच्या पाच आमदारांना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. निलंबित आमदारांमध्ये विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, TMC आमदार असित मजुमदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगाल विधानसभेत भाजप आमदार मनोज तिग्गा आणि टीएमसी आमदार असित मजुमदार यांच्यात हाणामारी झाली. या मारामारीत असित मजुमदार जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील गदारोळावर, एलओपी सुवेंदू अधिकारी म्हणाले की, सभागृहाचा शेवटचा दिवस असल्याने आम्ही राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चेची मागणी केली. यानंतर, आम्ही घटनात्मक मार्गाने निषेध केला, त्यानंतर सिव्हिल ड्रेस घातलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आणि टीएमसीच्या आमदारांनी आमच्या (भाजपच्या) आमदारांना मारहाण केली. भाजप नेते अमित मालवीय यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बीरभूमच्या घटनेवरून पश्चिम बंगाल विधानसभेत झालेल्या गदारोळावर विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी पुढे म्हणाले की, तृणमूल काँग्रेस, त्यांचे गुंड आणि पोलिसांविरोधात आमचा मोर्चा आहे. याबाबत स्पीकरकडेही जाणार आहोत. बंगालमधील परिस्थितीबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा.

बीरभूम हिंसाचारावरून बंगाल विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. यानंतर विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या 5 आमदारांना निलंबित, 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. बंगाल सरकारच्या विरोधात बीरभूम हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजप आमदारांची सभागृहात निदर्शने सुरू होती. ते सभागृह अध्यक्षांजवळ निदर्शने करत होते. तेव्हा मार्शलने भाजप आमदारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, टीएमसीच्या आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. मात्र, तृणमूल काँग्रेसचे आमदार असित मजुमदार हाणामारीत जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!