Cylinder Blast

Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी

1943 0

मुंबई : मुंबईतील चेंबूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये चेंबूर परिसरात सिलेंडरचा स्फोट (Cylinder Blast) झाला आहे. या स्फोटामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी 7.30 च्या सुमारास हा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर 11 जणांची ढिगाऱ्यातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

आज पहाटेच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला आहे. चेंबूर कॅम्प परिसरातील गोल्फ क्लबजवळील जुन्या परिसरात हा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता कि यामध्ये तेथील 4-5 एकमजली इमारती कोसळल्या. तसेच या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओवरून तुम्ही भीषण स्फोटाचा अंदाज लावू शकता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Solapur News : सोलापूर हादरलं ! पत्नी आणि मुलाची हत्या करुन शिक्षक पतीची आत्महत्या

Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल

Lalit Patil Drug Case : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! ससून रुग्णालयातील ‘तो’ कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

Share This News
error: Content is protected !!