मुंबई : नुकतीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. 48 तासांपूर्वी मुंबईत (Mumbai Airport) घातपात घडवून आणण्याचा फोन मुंबई पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. आता पुन्हा एकदा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल आला आहे. धमकी देणाऱ्याने मेलमध्ये बिटकॉइन्स देण्याची मागणी केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
एका अज्ञात व्यक्तीने कंपनी feedback.Bom@adani.com वर मेल केला आहे. quaidacasrol@gmail.com वरून ई-मेल पाठवून, त्याने मुंबई विमानतळावर बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मेलमध्ये लिहिले आहे की, जर 1 दशलक्ष डॉलर्सचे बिटकॉइन 48 तासांत ट्रान्सफर करा नाहीतर बॉम्बने उडवून देईन असं म्हटलं आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहार पोलिसांनी आयपीसीच्या कलम (505)(1)(बी), 506(2), 385 अन्वये धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेलदेखील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या अगोदरदेखील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Deepfake Technology : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले डीपफेक तंत्रज्ञान नेमके काय आहे?
IRCTC ची वेबसाईट ठप्प; तिकीट बुकिंग करताना येत आहेत अडचणी
KBC 15 : एक चुक पडली 97 लाखांना! विराटचा ‘विराट’ विक्रम थोडक्यात हुकला
Accident News : दुभाजकाला धडकून कारचा भीषण अपघात
Milk : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?
Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात