Deepfake Technology

Deepfake Technology : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले डीपफेक तंत्रज्ञान नेमके काय आहे?

540 0

डीपफेक (Deepfake Technology) हा एक बनावट व्हिडिओ किंवा फोटोचा प्रकार आहे. यामध्ये तुम्ही एखाद्याचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याने बदलला जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने असे बनावट व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केले जातात. डीपफेक व्हिडिओ हा एक प्रकारचा सिंथेटिक मीडियाचा प्रकार आहे. हे व्हिडिओ इतके अचूक असतात कि तो ओरीजिनल आहे कि डुप्लिकेट हे सहज ओळखता येणार नाही. डीपफेक व्हिडिओ मनोरंजन, शिक्षण आणि चुकीच्या माहितीसह, खोट्या बातम्या पसरविण्यासाठी वापरण्यात येतात. चला तर मग आज आपण नेमके हे तंत्रज्ञान काय आहे? याबद्दल जाणून घेऊया…

डीपफेक तंत्रज्ञान हे कृत्रिम बुद्धिमत्ताचा एक प्रकार असून त्याचा वापर लोक अशा गोष्टींसाठी करत आहेत जे ते प्रत्यक्षात कधीच करू शकले नसते. एखाद्या व्यक्तीचे फोटो आणि व्हिडिओंचे मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण केले जाते. त्यानंतर त्या व्यक्तीचे स्वरूप आणि आवाज यांचे वास्तववादी मॉडेल तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने बनावट व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग बनवली जाते. यालाच डीप सिंथेसिस तंत्रज्ञान म्हणतात. डीपफेक हे सखोल संश्लेषण तंत्रज्ञानातील सर्वात कुप्रसिद्ध प्रयोगांपैकी एक आहे.

या तंत्रज्ञानाच्या गैरवापरचा सर्वात मोठा धोका महिलांना असून त्यांना लैंगिक वस्तूच्या रूपात डीपफेकच्या माध्यमातून सर्वात जास्त दाखवले जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अश्लिल व्हिडिओ बनवले जातात. राजकीय नेते एकमेकांच्या विरोधात डीपफेकला शस्त्र बनवू शकतात बनावट व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या मतात देखिल फेरफार करू शकतात. या शिवाय, चॅटबॉट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे बनवलेली सामग्री मानवी आणि मशीन निर्मित सामग्रीमधील रेषा अस्पष्ट करते, त्यामुळे खरी आणि बनावट माहितीमध्ये फरक करणे कठीण होते.

आतापर्यंत कोण – कोण या डीपफेक तंत्रज्ञानाला बळी पडले?
दाक्षिणात्य सिने अभिनेत्री रश्मिका मंदाना
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
अभिनेत्री स्कारलेट जोहानसन
क्रिकेटपटू शुबमन गिल
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IRCTC ची वेबसाईट ठप्प; तिकीट बुकिंग करताना येत आहेत अडचणी

KBC 15 : एक चुक पडली 97 लाखांना! विराटचा ‘विराट’ विक्रम थोडक्यात हुकला

Accident News : दुभाजकाला धडकून कारचा भीषण अपघात

Milk : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात

Share This News
error: Content is protected !!