Accident News

Accident News : दुभाजकाला धडकून कारचा भीषण अपघात

447 0

ठाणे : राज्यात सध्या अपघाताचे (Accident News) प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. रोज कुठे ना कुठे अपघात झाल्याच्या घटना समोर येताना दिसत आहेत. अशातच ठाण्यातील मीरारोड येथून अपघाताची एक घटना समोर आली आहे. भरधाव कार दुभाजकाला धडकल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

काय घडले नेमके?
मिरारोड पूर्वच्या काशीमीरा परिसरातील सृष्टी कॉम्प्लेक्समधील कल्पतरु सोसायटीजवळच्या दुभाजकाला एक भरधाव वेगात असणारी कार धडकली. या अपघातात कार रस्त्यावर उलटल्याची घटना घडली आहे. दुभाजकाला धडकल्यानं कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात कारचा पूर्ण चक्काचूर झाला आहे.

अशा भयंकर अपघातात बऱ्याचदा लोकांना आपला जीव गमवावा लागतो. बऱ्याचदा चुकी नसलेल्यांनाही अपघाताचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना सतर्क राहणं गरजेचं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kolhapur Accident : गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा कोल्हापुरात भीषण अपघात

Milk : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा नवा लूक; Video व्हायरल

Prof. Namdevrao Jadhav : चर्चेतला चेहरा : प्रा. नामदेवराव जाधव

ICC चा मोठा निर्णय ! आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंवर घातली बंदी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!