Auto Accident

Auto Accident : भीषण अपघात! भरधाव शाळकरी रिक्षाची ट्रकला धडक; पोरं रस्त्यावर फेकली गेली

562 0

आंध्र प्रदेश : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी एक भीषण अपघात (Auto Accident) घडला आहे. शाळकरी मुलांना घेऊन जाणारी रिक्षा आणि ट्रक यामध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातात 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून सध्या तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

नेमका कसा घडला अपघात?
शाळकरी मुलांना नेणारी रिक्षा आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला. आज सकाळी 7 वाजून 36 मिनिटांनी हा अपघात झाला. हा अपघात विशाखापट्टणममधील एका उड्डाणपुलाखालील चौकात झाला. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, उड्डाणपुलाखालील रस्त्यावरुन ट्रक येत असतानाच दुसऱ्या बाजूने भरधाव वेगात येणाऱ्या शाळकरी मुलांना घेऊन जात असलेल्या रिक्षाने ट्रकला धडक दिली.

https://twitter.com/PTI_News/status/1727200705176621477

रिक्षा इतक्या वेगात होती की ट्रकला धडक दिल्यानंतर रिक्षामधली मुलं रस्त्यावर पडली. अपघातानंतर रिक्षामधून बाहेर फेकल्या गेलेल्या काही मुलांची शुद्ध हरपल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या सगळ्या दुर्घटनेत रिक्षा चालकाची चूक असल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Ahmednagar News : अहमदनगर हादरलं ! पतीच्या विवाहबाह्य संबंधात पत्नीचा अडथळा; हत्येचा कट रचला आणि..

Bageshwar Baba : पुण्यात बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमस्थळी राडा; बाबाच्या स्वयंसेवकांची भक्ताला मारहाण

Drinking Alcohol : बिअर, वाईन, व्हिस्की की रम? कोणतं मद्य आहे शरीराला अधिक धोकादायक?

Pune Video : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत ! ग्राहकांच्या डोळ्यादेखत वाईन शॉप लुटले

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!