IND vs AUS Final 2023

IND vs AUS Final 2023: भारताचे हे 5 गोलंदाज ठरू शकतात ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी

648 0

अहमदाबाद : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महामुकाबला (IND vs AUS Final 2023) पार पडणार आहे. तब्बल 20 वर्षानंतर हे दोन्ही संघ पुन्हा एकदा फायनलमध्ये भिडताना दिसणार आहेत. या अगोदर 2003 मध्ये या दोन्ही संघात फायनल झाली होती मात्र त्यावेळी टीम इंडियाचा पराभव झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा टीम इंडिया पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत सध्या चालू असलेल्या वर्ल्डकपमध्ये अजूनही अपराजित आहे. टीम इंडियाची सध्याची कामगिरी बघता ती सामना जिंकायचे शक्यता जास्त आहे. मात्र क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकते. आजच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांची भूमिका खूप महत्वाची असणार आहे. चला तर मग आज आपण भारताच्या सुपर 5 गोलंदाजांबद्दल जाणून घेऊया…

भारताचे तीन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यासह फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी चमकदार कामगिरी केली आहे. भारताच्या सलग 10 विजयामध्ये या गोलंदाजांचे महत्वाची भूमिका होती. जसप्रीत बुमराहने 18 विकेट घेतल्या आहेत. रविंद्र जडेजाने 16 फलंदाजांची शिकार केली. कुलदीप यादवने 15 विकेट घेतल्या आहेत. तर मोहम्मद सिराजने 13 विकेट घेतल्यात. भारतीय गोलंदाजांनी यंदाच्या विश्वचषकात 85 विकेट घेतल्या. आता फायनलमध्ये टीम इंडिया कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

भारताचे सुपर 5 गोलंदाज
नाव                       सामने        विकेट
मोहम्मद शमी         06             23
जसप्रीत बुमराह      10              18
रविंद्र जडेजा           10              16
कुलदीप यादव        10              15
मोहम्मद सिराज      10              13

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!