Chhagan Bhujbal and manoj Jarange

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून… मनोज जरांगेचा मोठा आरोप

1690 0

सातारा : मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा आज 4 था दिवस आहे. आज ते साताऱ्यात आहेत. यावेळी त्यांनी इस्लामपूर येथील सभेत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. छगन भुजबळ यांनी केलेली वक्तव्ये पाहता त्याना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत असा आरोप मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात आला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?
भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावरून अपेक्षा करतो की आत्ताचे मुख्यमंत्री लवकरात लवकर आरक्षण देतील टाईम बॉण्ड ही देतील. शिवाय मंत्री छगन भुजबळ यांना समजूनही सांगतील. उशिरा का होईना पाप बाहेर आले आहे. दंगली घडवण्यासाठी वक्तव्य सुरु आहेत. वैचारिक विचार मांडले पाहिजे. तो माणून ओबीसीसह मराठा समाजाच्या मनातून उतरला आहे असे मनोज जरांगे म्हणाले आहेत. मराठा-ओबीसीनी एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, ही राजकीय मंडळी आपल्यात झुंज लाऊ शकतात. त्यामुळे सावध राहा असे आवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केले आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यावर तुफान हल्ला केला. “कोणाचं खाता कोणाचं खाता? असं म्हणतो, पण तुझे खातो काय रे ?” असं म्हणते भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायच आहे? त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असं भुजबळ म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nashik News : गॅस भरताना ओमनी कारचा अचानक झाला स्फोट; चिमुकल्यांसह 10 जण जखमी

Yavatmal News : धक्कादायक ! विजेचा शॉक लागून विद्यूत कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

IND vs AUS : वर्ल्ड कपच्या फायनलसाठी पीएम मोदींसह ‘हे’ दिग्गज नेते राहणार उपस्थित

Share This News
error: Content is protected !!