Nashik News

Nashik News : गॅस भरताना ओमनी कारचा अचानक झाला स्फोट; चिमुकल्यांसह 10 जण जखमी

876 0

नाशिक : नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये मारुती व्हॅन कारमध्ये गॅस भरताना आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. नाशिकमधील येवल्याच्या मुलतानपुरा भागात घडली असून आगीत 10 प्रवासी भाविक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन लहान बालक आणि एका महिलेचा समावेश आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालय तर काहींना खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

काय घडले नेमके?
दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील पूर्णा येथून शिर्डीतील साई दर्शनासाठी आलेलं कुटुंब नगरसुल रेल्वे स्टेशनवर दाखल झाले होते. यावेळी नगरसुल येथून दुसऱ्या खाजगी वाहनाने ते येवल्यात आले. येवल्यातून शिर्डीसाठी त्यांनी एक मारुती व्हॅन कार भाड्याने घेतली. या कारमध्ये गॅस भरत असताना हा भीषण स्फोट झाला. येवला शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या पक्की मज्जिद भागामध्ये ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत 10 प्रवासी भाविक जखमी झाले आहेत.

चालकाने येवल्यात आल्यानंतर एका ठिकाणी सुरु असलेल्या अवैध गॅसच्या अड्डयावर गाडी घेऊन गेला. तेथे गॅस भरत असतांना अचानक आग लागली. आग लागल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणून जखमीना हॉस्पिटल मध्ये दाखल केले. या घटनेनंतर आरोपी कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

आदित्य अवचारे (वय 11), सीमा कसबे, प्रदीप अवचारे, वैभव लिंबे (वय 22), विराज कसबे (वय 4), प्रतिभा लिंबे (वय 39), वैदही कसबे (वय15),अनुष्का कसबे (वय 14), गीता कसबे वय (22) अशी या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Yavatmal News : धक्कादायक ! विजेचा शॉक लागून विद्यूत कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

IND vs AUS : वर्ल्ड कपच्या फायनलसाठी पीएम मोदींसह ‘हे’ दिग्गज नेते राहणार उपस्थित

Aaditya Thackeray : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!