Bujbal And Jarange

Manoj Jarange : जरांगेंनी भुजबळांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर; म्हणाले भुजबळांचं वय झालं, पण…

1685 0

सांगली : छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मराठा समाजाने आता ठरवले आहे, आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही. त्यांना तेच काम उरले आहे. लोकांचे खाल्ल्याने ते आतमध्ये जाऊन आले आहेत. कोण कुणाचे खात आहे सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलू नाहीत. तुम्ही टीका केली तर, तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाहीत. या राज्यात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. आता आम्ही देखील 50 टक्के आहे. लोकांचे पैसे खाता, रक्त पिता का? मग तुम्हाला कोण देव मानणार आहे. वयाने तुम्ही मोठे आहेत. आम्हाला काढायला लावू नयेत. आम्ही देखील तुमचा बायोडेटा काढला आहे. धमक्या देऊ नयेत, असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते भुजबळ ?
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यावर तुफान हल्ला केला. “कोणाचं खाता कोणाचं खाता? असं म्हणतो, पण तुझे खातो काय रे ?” असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या आरक्षण द्या, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायच आहे? त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असं भुजबळ म्हणाले. जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसीची महाएल्गार सभा पार पडली यावेळी त्यांनी ही टीका केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!