Karnataka News

Karnataka News : कर्नाटक हादरलं! घरात घुसून आईसह तीन मुलांची निर्घृणपणे हत्या

1162 0

कर्नाटक : वृत्तसंस्था – कर्नाटकातून (Karnataka News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात रविवारी अज्ञात हल्लेखोराने एकाच कुटुंबातील चार जणांची चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या केली आहे. या हत्येमुळं कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाला सुरुवात केली. एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. या हल्ल्यात आणखी एक महिला जखमी झाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
उडुपी जिल्ह्यातील केमन्नू भागात एका महिलेसह तिच्या तीन मुलांची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली आहे. माक्स घातलेल्या व्यक्तीने जबरदस्तीने घरात घुसून हसीना नावाची महिला आणि तिच्या तीन मुलांवर हल्ला केला. या हल्ल्यात आणखी एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही हत्या नेमकी कशामुळे करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या हत्येमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत महिलेचा पती आखाती देशात काम करतो. कर्नाटक पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!