क्राईमराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीयव्हिडिओ

Hyderabad News : गिझर सुरू ठेवून दिवाळीच्या शॉपिंगसाठी जाणे कुटुंबाला पडले महागात

हैदराबाद : वृत्तससंस्था – हैदराबादमधून (Hyderabad News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये गिझर सुरू ठेवून दिवाळीच्या शॉपिंगला जाणे एका कुटूंबाला चांगलेच महागात पडले आहे. गिझर सुरू ठेवल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन सोसायटीत आग लागली. या आगीत दोन खोल्या जळून खाक झाल्या आहेत. अद्याप तरी यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही. एक कुटुंब दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलं आणि गिझर चालू ठेवल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही. यामुळे ही दुर्घटना घडली आहे.या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजरने ‘तुम्ही आलिशान गेटेड सोसायटीमध्ये राहू शकता परंतु तुम्हाला मूलभूत गोष्टींचं पालन करावं लागेल. हे कुटुंब गिझर चालू करून दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलं. संपूर्ण सोसायटी उत्सवासाठी अतिरिक्त वीज घेत असल्याने शॉर्ट सर्किटमुळे 2 खोल्या जळून खाक झाल्या.’ अपलोड केल्यापासून हा व्हिडिओ 6.47 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.