Rohit Sharma

IND vs NED : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने केला ‘हा’ मोठा विक्रम

818 0

बंगळुरू : आज वर्ल्ड कप 2023 मध्ये साखळी फेरीतील भारताचा अखेरचा सामना नेदरलँडविरुद्ध (IND vs NED) खेळवला जात आहे. भारताने या वर्ल्डकपमध्ये अजून एकही सामना गमावलेला नाही. आजचा सामना जिंकून भारत आपला विजयरथ कायम ठेवायचा प्रयत्न करेल. आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर भारताच्या सलामीच्या जोडीने नेदरलँडच्या गोलंदाजांवर हल्ला चढवत तुफान फटकेबाजी केली.

रोहित शर्माने केला ‘हा’ विक्रम
रोहित शर्माने सातव्या षटकात पहिला षटकार मारला. यासह एका वर्ल्ड कपमध्ये तो सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार ठरला आहे. तसंच एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने एबी डिविलियर्सला मागे टाकलं. रोहित शर्माचे आतापर्यंत 59 षटकार झाले असून डिविलियर्सचने 2015 मध्ये एका वर्षात 58 षटकार मारले होते.

भारताचा सलामीवीर शुभमन गिलने तुफान फटकेबाजी करताना ३० चेंडूत अर्धशतक केलं. यात त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले. भारताच्या 100 धावा झाल्या असताना शुभमन गिल 51 धावांवर बाद झाला. निदामानुरुने सीमारेषेवर त्याचा झेल घेतला.विराट आणि रोहित भारताची पुढील कमान सांभाळत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!