Uttarakhand

Uttarakhand : बांधकाम सुरू असलेला बोगद्याचा भाग कोसळला, 50 पेक्षा जास्त मजूर अडकले

1107 0

उत्तरकाशी : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) उत्तरकाशी जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. यात अद्याप कोणतीही जिवितहानी झालेली नाही मात्र 50 ते 60 या ठिकाणी अडकले असल्याचे समजत आहे. उत्तराखंड सरकार आणि प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.

या दुर्घटनेत आत अडकलेल्या मजूरांसाठी ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असून एक अतिरिक्त ऑक्सिजन पाइप बोगद्यात पोहोचवण्यात आली आहे. सर्व मजूर सुरक्षित आहेत. ही घटना रविवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. बोगद्यापासून आता 200 मीटर अंतरावर घडली असून मजूर तीन किमी आत होते त्यामुळे सुरक्षित राहिले.

या अगोदरदेखील उत्तराखंडमध्ये अशीच एक दुर्घटना घडली होती. यामध्ये ऑगस्ट महिन्यात ऋषिकेश कर्णप्रयाग रेल्वेमार्ग योजनेच्या एडिट 2 बोगद्यात 114 मजूर अडकले होते. शिवपुरी इथं पुरामुळे यामध्ये पाणी साचलं होतं. पोलिसांच्या एका टीमने या बोगद्यातलं पाणी काढून दोरखंडाच्या मदतीने सर्व 114 मजूरांना सुखरुप बाहेर काढलं होतं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!