पुणे : पुण्यातील (Pune News) वाघोली-केसनंद रस्ता येथे कोणार्क ऑर्चिड ही 12 मजली बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमधील एका घराला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.