Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादा दिल्लीला रवाना; चर्चांना उधाण

397 0

पुणे : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची आज भेट झाली होती. ही भेट आज पुण्यात प्रतापराव पवार यांच्या घरी झाली होती. शरद पवार पोहोचल्यानंतर जवळपास अर्धा तास अजित पवार तिथेच होते. या भेटीनंतर अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.

शरद पवार यांचे भाऊ आणि अजित पवार यांचे काका प्रतापराव पवार यांचं पुण्यातील बाणेर परिसरात निवास्थान आहे. आज दुपारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. प्रतापराव पवार यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे या प्रतापराव पवार यांच्या घरी पोहोचल्या होत्या. यावेळी अजित पवार सुद्धा हजर होते.

शरद पवार आल्यानंतर अजितदादा हे अर्धा तास घरीच होते. त्यानंतर अजितदादा हे प्रतापराव पवार यांच्या घरातून बाहेर पडले. अजितदादा आता दिल्लीला रवाना होणार आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार दिल्लीत जात असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल पटेल हे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!