Akram Khan

Akram Khan : पाकिस्तानमध्ये अक्रम खानची गोळ्या घालून हत्या

824 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लष्कर-ए- तोयबाचा माजी कमांडर अक्रम खान (Akram Khan) उर्फ ​​अक्रम गाझी याची पाकिस्तानात (Pakistan) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अक्रम भारताविरुद्ध सातत्याने कटकारस्थान करत होता. अक्रम खान याने 2018 ते 2020 या काळात लष्करातील भरतीचे काम पाहिले होते. आता त्याची पाकिस्तानात हत्या करण्यात आली आहे.

लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) माजी नेता अक्रम खान यांची गुरुवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पाकिस्तानातील बाजौरमध्ये अक्रम खान उर्फ ​​अक्रम गाझी याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. दहशतवादी अक्रम गाझी याने 2018 ते 2020 या काळात लष्कर भरती कक्षाचे नेतृत्व केले. तसेच ते पाकिस्तानमध्ये भारतविरोधी भाषणांसाठी ओळखला जात होते. अक्रम हा लष्कराच्या प्रमुख कमांडरांपैकी एक आहे. तो बराच काळ दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता.

अक्रम खान याच्या अगोदर मुफ्ती कैसर फारुख, खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड, एजाज अहमद अहंगर, बशीर अहमद पीर यांसारख्या अनेक दहशतवाद्यांची हत्या केली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये, भारताचा आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफचीही पाकिस्तानमध्ये हत्या करण्यात आली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!