ST Bus

Bonus : एसटी कर्मचा-यांना बोनस जाहीर; मात्र तरीदेखील कर्मचारी नाराज

1644 0

मुंबई : एसटी कर्मचा-यांना राज्य सरकारकडून बोनस जाहीर करण्यात आला आहे. एसटी कर्मचा-यांना 6 हजार रुपये इतका बोनस (Bonus) दिला जाणार आहे. बोनसची रक्कम ऐकून एसटी कर्मचारी मात्र नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारनं एसटी कर्मचा-यांना बोनसच्या रुपात दिवाळी भेट दिली खरी मात्र त्याने कर्मचाऱ्यांचे समाधान झालेले नाही.

दुसरीकडे सिडकोच्या कर्मचाऱ्यांना छप्पर फाड बोनस देण्यात आला आहे. सिडको कर्मचा-यांना तब्बल 50 हजारांचा बोनस जाहीर झाला आहे. दिवाळीनिमित्त सिडको प्रशासनाने सिडको कर्मचाऱ्यांना तब्बल 50 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. महामंडळांमध्ये हा सर्वाधिक बोनस आहे. बोनस मिळताच सिडको कर्मचा-यांनी ऑफिसच्या बाहेर फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!