Manoj Jarange

Manoj Jarange Patil : जरांगे पाटील 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

1525 0

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी नवी डेडलाईन दिली आहे. यामुळे सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे. यादरम्यान आता जरांगे पाटील यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपला महाराष्ट्र दौरा कसा असणार याची माहिती दिली आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
‘पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असा हा दौरा असणार आहे. राजश्री शाहू महाराज यांचा आशीर्वाद घेऊन कोल्हापुरातून दौऱ्याला सुरुवात होईल. या दौऱ्याची सांगता शेवगावमध्ये होणार आहे. 15 नोव्हेंबरला वाशी, परंडा, करमाळा 17 नोव्हेंबरला सांगली, कोल्हापूर, कराड, 18 नोव्हेंबरला सातारा, वाई, रायगड असं या दौऱ्याचं स्वरूप असेल’ असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा
Cabinet Decision : मराठा आरक्षण अहवालावर मंत्रिमंडळाकडून शिक्कामोर्तब, शिंदे सरकारने घेतले ‘हे’ निर्णय

Supriya Sule : मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून सुप्रिया सुळेंनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाचे 300 फूट उचं टॉवरवर चढून आमरण उपोषण

Join our WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter for every update

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!