Jalgaon News

Jalgaon News : 22 वर्षीय गरोदर विवाहित तरुणीची आत्महत्या

531 0

जळगाव : जळगावमधून (Jalgaon) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका 22 वर्षीय गरोदर विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. ही घटना उघडकीस येताच तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यामध्ये तिच्या पोटातील बाळ देखील दगावले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
मनवेल ता. यावल येथील रहिवाशी शितल उर्फ रूपाली विजय कोळी हे आपल्या घरी राहत होती. यादरम्यान घरात तिने छताच्या आडव्या लोखंडी एंगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. सदर प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच तीला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे (Dr. Prashant Jawle) यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.

मृत शितलच्या पोटात पुरुष जातीचे अर्भक होते, ते देखील यात दगावले आहे. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भगवान कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर (Police Inspector Rakesh Mangaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे (Sub-Inspector of Police Sunil More) हे पुढील तपास करत आहेत.

Pune News : पुण्यातील माजी सरपंचाची इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Solapur News : सोलापूर हादरलं ! पत्नीची हत्या करून पतीचीदेखील आत्महत्या

Mumbai Crime News : एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची जेलमध्येच आत्महत्या

Join our WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter for every update

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!