Breaking News
Nanded Crime

Nanded Crime : नांदेडमध्ये ‘मुळशी पॅटर्न’ ! 22 जणांकडून तरुणाची तलवारीने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या

806 0

नांदेड : आपण मुळशी पॅटर्न चित्रपट पहिलाच असेल. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या घटनेचा प्रत्यय नांदेडमध्ये (Nanded Crime) पाहायला मिळाला. यामध्ये 22 जणांकडून तरुणाची तलवारीने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. खंडणी न दिल्यामुळे ही हत्या करण्यात आली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये वार करण्यात आलेल्या तरुणाचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे.

काय घडले नेमके?
नांदेड शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात सोमवारी रात्री ही घटना घडली. सागर यादव असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यात अजून दोघेजण जखमी झाले आहेत. सागर पवार हा डेली निड्स आणि फायनान्स चालवतो. मोक्काचा आरोपी असलेल्या केशव पवार याने त्याला खंडणी मागितली होती. पण सागर याने खंडणी देण्यास नकार दिला होता.त्यामुळे या दोघांमध्ये फोनवरून वाद झाला. त्यामुळे केशव पवार याने आपल्या गँगमधील 20 ते 22 जणांसोबत रात्री सागर यादव याचा शोध घेत सराफा बाजारात आला. सोबत पवारने पोत्यात आणलेल्या एक एक तलवारी आणि खंजर काढत गँगने सागर यादव आणि त्याच्या भावासह अन्य एकावर वार करण्यास सुरुवात केली.

तलवारीचे वार झेलत सागरचा भाऊ कसाबसा जीव वाचवून पळाला. पण सागर हल्लेखोरांच्या तावडीत सापडला. सागरवर तलवारीने अनेक वार करण्यात आले. अनेक गंभीर वार झाल्याने सागरचा घटनास्थळी तडफडून मृत्यू झाला. ही सर्व घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या प्रकरणी नांदेड पोलिसांनी आरोपी केशव पवारसह 20 ते 25 जणांविरोधात हत्या, खंडणी आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!