Clove

Clove : पोटाची समस्या असेल तर लवंग ठरत आहे गुणकारी

729 0

लवंग (Clove) हा सर्वसाधारण मसाल्याचा पदार्थ. हा पदार्थ जवळपास सर्वच जेवणात वापरला जातो. बिर्याणी किंवा कोणताही पदार्थ बनवताना तो स्वादिष्ट बनवण्यासाठी लवंगचा वापर केला जातो. या पदार्थाला स्वतःची एक वेगळी चव आहे. मात्र असे असले तरी अनेक वेळा हा पदार्थ जेवताना बाजूला काढला जातो. मात्र ही लवंग बाजूला काढण्यापेक्षा जर ती खाल्ली तर त्याचा आपल्या शरीराला फायदा होता. कसा ते आज आपण जाणून घेणार आहोत…

लवंगमुळे पोटाचे त्रास दूर होतात. अपचन होऊ नये म्हणून हा पदार्थ जेवणात वापरला जातो. पोटफुगी देखील यामुळे कमी होते. पोटदुखी होत असेल तर लवंग त्यावर गुणकारी मानली जाते. दात दुखण्यावर हे एक उत्तम औषध असून लवंगीच तेल किंवा लवंग दातांत धरली जाते. त्यामुळे दातांना आणि हिरड्यांना आराम मिळतो.

तोंडातील रोग कमी होतात. तोंडातील चिकटा कमी करण्याचे काम लवंग करते. यामुळे तोंडाची दुर्गंधीदेखील कमी होते. बिर्याणी हे पचायला जड असणारा पदार्थ आहे. जो पदार्थ पचायला जड आहे अशा जेवणात लवंग हमखास टाकली जाते. त्यामुळे जेवणात जर लवंग आली असेल तर ती बाजूला न काढता ती खावा त्यामुळे तुमचे बरेच आजार दूर होतील.

Share This News
error: Content is protected !!