Rahul Eknath And Uddhav

Shivsena MLA : ठाकरे-शिंदे सुनावणीत नवा ट्वीस्ट; शिवसेना आमदारांना विजय जोशी यांनी बजावला व्हीप

657 0

मुंबई : शिवसेना आमदार (Shivsena MLA) अपात्रतेची सुनावणी आज पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर झाली. आजच्या सुनावणीवेळी व्हीपवरून शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. ठाकरे गटाकडून जारी केलेला व्हीप आपल्याला मिळालाच नसल्याचा दावा, शिंदे गटाकडून करण्यात आला. तसंच ठाकरे गटाकडून प्रत्येक सुनावणीवेळी नवीन कागदपत्र सादर करण्यावरही शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. या प्रकरणाची आजची सुनावणी संपली असून पुढची सुनावणी 21 नोव्हेंबरला होणार आहे.

व्हीपवरून ठाकरे-शिंदे गटात जुंपली
एकनाथ शिंदे यांना मेल आणि व्हीप मिळाल्याचा पुरावा आहे, असा युक्तीवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला. पण शिंदे गटाने व्हीप न मिळाल्याचं सांगितलं आहे. शिंदे गटाकडून सांगण्यात आलं की मेल हा अधिकृत मेलवरून पाठवण्यात आला नाही, तसंच प्रत्यक्षदर्शी आणि मेलद्वारे त्यांना व्हीप मिळाला नाही. ठाकरे गटाने मात्र आम्ही पुरावा सादर केल्याचा दावा सुनावणीवेळी केला. विजय जोशी यांच्या ईमेलवरून एकनाथ शिंदे यांना व्हीप मेल वरून पाठवला होता. एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत इमेल आयडीवर मेल पाठवलेला आह, हा त्यांनीच दिलेला मेल आयडी आहे, गरज पडल्यास आयटी एक्सपर्टला बोलवू,’ अशी बाजू ठाकरेंच्या वकिलांकडून मांडण्यात आली.

विजय जोशी कोण?
‘जर आम्ही व्हीप आलाच नाही म्हणतोय तर तो सादर करण्याचा प्रश्नच नाही. विजय जोशी कोण आहे, मला माहिती नाही? त्यांच्या ईमेलवरून मेल आला असं सांगितलं जातंय, असा पलटवार शिंदे गटाच्या वकिलांकडून करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!