Junior Balaiah

Junior Balaiah : प्रसिद्ध तमिळ अभिनेते जूनियर बलैया यांचा गुदमरून मृत्यू

1097 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तामिळ चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये प्रसिद्ध तमिळ अभिनेतेते जूनियर बलैया (Junior Balaiah) यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूमुळे तमिळ इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकारांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

कसा झाला मृत्यू?
तमिळ अभिनेते जूनियर बलैया हे चेन्नई येथील राहत होते. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, 2 नोव्हेबरला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सकाळी उठल्यानंतर त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. श्वास घेता न आल्याने ते गुदमरले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जूनियर बलैया यांच्या जाण्याने तामिळ इंडस्ट्रीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

जूनियर बलैया यांचा जन्म 28 जून 1953साली झाला. त्यांचं खरं नाव रघु बलैया असं होते. तमिळ अभिनेते टीएस बलैया हे त्यांचे वडील होते. जूनियर बलैया यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात ही नाटकातून केली होती.जूनियर बलैया यांनी काराकट्टाकरण, गोपुरा वासलिल आणि सुंदरकंदम सहीत 100 सिनेमात काम केलं होतं. 2010मध्ये त्यांनी तमिळ सिनेसृष्टीत अनेक दर्जेदार भूमिका निभावल्या होत्या. त्यांच्या अभिनयावर प्रेक्षक प्रचंड प्रेम करायचे. 2012मध्ये आलेल्या सत्तई सिनेमा साकारलेल्या हेडमास्टरच्या भूमिकेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती.

Share This News
error: Content is protected !!