मुबई : सध्या भारतात वनडे वर्ल्डकप 2023 खेळवला जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये वानखेडेच्या मैदानावर आज सामना पार पडत आहे. या सामन्यात श्रीलंकेच्या टीमने टॉस जिंकत प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. या वेळी भारताची सुरुवात काहीशी खराब झाली. भारताचा कर्णधार आणि ओपनर रोहित शर्मा हा 4 धावा करून तंबूत परतला. यानंतर विराट आणि शुभमन गिल यांनी सावध खेळी करत भारताचा डाव सावरला आहे. या सामन्यात 34 धावा करताच विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
काय आहे तो विक्रम?
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा एक हजार धावांचा विक्रम आता विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर जमा झालाय. विराट कोहलीने आठव्यांदा एका वर्षांत एक हजार धावांचा पल्ला पार केला आहे. याआधी विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकी सात वेळा वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात एक हजारांपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आता त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
Most 1000 runs in calender year in ODI history:
Virat Kohli – 8*
Sachin Tendulkar – 7 pic.twitter.com/KMJTQBx4fs
— Johns. (@CricCrazyJohns) November 2, 2023
विराट कोहलीने कधी कधी वर्षभरात एक हजार धावांचा पल्ला पार केला ?
वर्ष 2011: 34 सामने 47.62 च्या सरासरीने 1381 धावा (4 शतक आणि 8 अर्धशतक)
वर्ष 2012: 17 सामने 68.40 च्या सरासरीने 1026 धावा (5 शतक आणि 3 अर्धशतक)
वर्ष 2013: 34 सामने 52.83 च्या सरासरीने 1268 धावा (4 शतक आणि 7 अर्धशतक)
वर्ष 2014: 21 सामने 58.55 च्या सरासरीने 1054 धावा (4 शतक आणि 5 अर्धशतक)
वर्ष 2017: 26 सामने 76.84 च्या सरासरीने 1460 धावा (6 शतक आणि 7 अर्धशतक)
वर्ष 2018: 14 सामने 133.55 च्या सरासरीने 1202 धावा (6 शतक आणि 3 अर्धशतक)
वर्ष 2019: 26 सामने 59.86 च्या सरासरीने 1377 धावा (5 शतक आणि 7 अर्धशतक)
वर्ष 2023 : 1000 धावा