Bacchu Kadu

Maratha Reservation : मराठा पाकिस्तानचा की अमेरिकेचा? आरक्षणावरून बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया

335 0

छत्रपती संभाजीनगर : ज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. मात्र 40 दिवस देऊनदेखील मराठा आरक्षण न मिळाल्याने जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. यादरम्यान आमदार बच्चू कडू यांनी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मराठा समाजातील लोकं पाकिस्तान आणि अमेरिकेचे आहे काय? , त्यांना आरक्षण का मिळत नाही असे म्हटले आहे.

काय म्हणाले बच्चू कडू ?
आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे भव्य रक्तदान शिबीर घेतलं. तसेच, स्वतः रक्तदान केलं. यावेळी, त्यांनी मराठा आरक्षणावरून संतप्त प्रतिक्रिया दिली. “निवडक मराठ्यांसाठी आपण वाळीत टाकण्या सारख करीत आहे. तसाही ओबीसीला भेटलेला आरक्षण कमीच आहे. हे 52, 55 टक्के आरक्षण जातो. त्यामुळे, ओबीसींचा आरक्षण वाढून घ्या किंवा अ, ब, क, ड करावे. पण, साफ नाही म्हटल्याने चुकीचं संदेश जातो. तसेच, मराठा ओबीसी नाही का? मराठा कोण आहे?, पाकिस्तानचा आहे की अमेरिकेतला आहे का?, याचा आरक्षणावर अधिकार का नाही?, असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला.

सरकार आणि जरागेंमध्ये संवाद घडवण्याची जबाबदारी बच्चू कडू यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असेपर्यंत आमदार बच्चू कडू अंतरवली सराटी येथे तळ ठोकून राहणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!