Jalgaon News

Jalgaon News : जळगाव हादरलं ! दिवाळीची साफ-सफाई तरुणाच्या जीवावर बेतली

725 0

जळगाव : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र दिवाळीचा उत्साह पहायला मिळत आहे. यादरम्यान जळगावमधून (Jalgaon News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दिवाळीची साफ-सफाई एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे.

काय घडले नेमके?
सुनील चव्हाण असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना भुसावळमधील मन्यारखेडा या ठिकाणी घडली आहे. मृत सुनील हा अनिल अग्रवाल यांच्या फटाक्याच्या दुकानात कामाला होता. मंगळवारी अनिल यांनी त्याला घरी साफ सफाईसाठी पाठवलं. त्याच्यासोबत आणखी एक मुलगा साफ सफाईच्या कामासाठी आला होता. मोकळ्या प्लॉटमधील गवत काढताना त्याचा पाय विजेच्या तारेवर पडला आणि त्याला जोरात विजेचा धक्का बसला. हा शॉक एवढा भयंकर होता कि यामध्ये त्याचे कपडे जळाले आणि त्याच्या मानेलाही गंभीर दुखापत झाली.

यानंतर सुनीलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेमुळे मृत सुनीलच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण कुटुंबीय मोलमजुरी करत असल्यानं सुनील हा मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. आपला तरुण पोरगा गमावल्याने चव्हाण कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

Share This News
error: Content is protected !!