बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘जवान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. यादरम्यान या चित्रपटाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
काय आहे तो विक्रम?
यूएईमध्ये ‘जवान’ हाईएस्ट ग्रॉसर सिनेमा ठरला आहे. यूएईमध्ये शाहरुखचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहते मोठ्या संख्येने सिनेमागृहात जाऊन शाहरुखचा ‘जवान’ हा सिनेमा पाहत आहेत. त्यामुळे यूएई बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा हाईएस्ट ग्रॉसर सिनेमांच्या यादीत नवव्या स्थानावर आहे. यूएईमध्ये या सिनेमाने 75 कोटींची कमाई केली आहे.
यूएईच्या हाईएस्ट ग्रॉसर सिनेमांच्या यादीत अवतार 2 (Avatar 2), एवेंजर एंडगेम (Avengers Endgame), स्पायडरमॅन : नो वे होम (Spiderman : No Way Home), फ्यूरियस 7 (Furious 7), द फेट ऑफ द फ्यूरियस (The Fate of the Furious), अलादीन (Aladdin), टॉप गन : म्हेवरिक (Top Gun : Maverick), द लायन किंग (The Lion King) या सिनेमांचा समावेश आहे. आता या यादीत ‘जवान’ या सिनेमादेखील स्थान मिळवले आहे. या यादीत स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.
या सिनेमात शाहरुखसह, नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, एजाज खान, सुनील ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच दीपिका पादुकोण आणि संजय दत्तची झलकही या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन एटली कुमारने केले आहे.