Gas Cylinder

Cylinder Price Hike : दिवाळीपूर्वी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर

1309 0

नवी दिल्ली : आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाई (Cylinder Price Hike) संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून पुन्हा एकदा व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. एक नोव्हेंबर म्हणजे आजपासून 19 किलोच्या व्यवसायिक सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.

आजपासून 19 किलोग्रॅमच्या व्यवसायिक सिलिंडरची किंमत राजधानी दिल्लीमध्ये 1,833 रुपयांवर पोहोचली आहे. दरवाढीपूर्वी दिल्लीमध्ये सिलिंडरची किंमत 1731 रुपये इतकी होती. मुंबईमध्ये व्यवसायिक सिलिंडरची किंमत 1785.50 रुपयांवर पोहोचली आहे. पूर्वी गॅस सिलिंडरचे दर 1684 रुपये इतके होते. कोलकातामध्ये व्यवसायिक गॅस सिलिंडरचा पूर्वीचा दर 1839.50 इतका होता आता त्यामध्ये वाढ होऊन तो 1943.00 रुपयांवर पोहोचला आहे. तर चेन्नईमध्ये गॅसच्या दरात वाढ होऊन गॅसचे भाव प्रति सिलिंडर 1943.00 रुपयांवर पोहोचले आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही
एकीकडे व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. 31 ऑगस्टला घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यानंतर गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!