Ambulance Accident

Ambulance Accident : मुंबई-पुणे हायवेवर रुग्णवाहिकेचा भीषण स्फोट

748 0

मुंबई : मुंबई पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेत असताना रुग्णवाहिकेचा (Ambulance Accident) भयानक अपघात झाला आहे. या अपघातात रुग्णवाहिकेतील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेले सुदैवाने बचावले. रुग्णाला उपचारासाठी नेत असताना हा भीषण अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
रुग्णाला उपचारासाठी घेऊन जात असताना मुंबई पुणे महामार्गावर अचानक रुग्णवाहिकेत बिघाड झाला. ही गोष्ट लक्षात येताच चालकाने रुग्णवाहिका थांबवली. यानंतर रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतला. आग लागताच रुग्णाचे नातेवाईक बाहेर पडले. मात्र, रुग्ण आतमध्ये अडकल्याने त्याचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. नीलववा कवलदार असे मृत महिलेचे नाव आहे.

गाडी थांबवल्यानंतर काही वेळातच मोठा स्पोट झाला. या स्फोटात रुग्ण वाहिकेच्या चिंधड्या उडाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या स्फोटामध्ये रुग्णवाहिकेका पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!