बीड : सध्या मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) राज्यातील राजकारण पेटले आहे. मराठा समाजाकडून आता उद्रेक पाहायला मिळत आहे. माजलगावमध्ये ठिकठिकाणी आंदोलकांकडून वाहनांना आग लागण्यात आलेली आहे तर शहरात अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांनी मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरले आहेत. आता आंदोलकांनी बीडमध्ये राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय पेटवलं आहे.
बीडमध्ये मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय पेटवलं pic.twitter.com/TPKBZmsytX
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) October 30, 2023
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला तसेच पार्किंगमध्ये काही मराठा आंदोलकनाकडून आग लावण्यात आली आहे. यामध्ये चार चाकी आणि दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या आहेत. बीडमध्ये आरक्षणावरून मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी बीड शहरातील राष्ट्रवादी भवन पेटवून दिले. हे पक्ष कार्यालय शरद पवार गटाचं असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.