ST

Pune ST Bus : पुण्याहून मराठवाड्यात जाणाऱ्या ST बसेस रद्द, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय

289 0

पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. बीड जिल्ह्यात शनिवारी आंदोलनामुळे तणावाचे वातावरण पसरले आहे. त्याचा परिणाम एसटी बसेस (Pune ST Bus) वर होताना दिसणार आहे. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत.

राज्यात मराठा आंदोलन शांततेत सुरू असताना बीड जिल्ह्यात एसटीच्या काही बसवर दगडफेक झाली होती. त्यानंतर पुण्यासह अन्य जिल्ह्यांतून बीड, लातूरकडे जाणाऱ्या काही बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार, छत्रपती शिवाजीनगर एसटी स्थानकातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बस रात्री अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे काही प्रवाशांना पुन्हा घरी जावे लागले.

रविवारीही शिवाजीनगर स्थानकावर बीड, लातूरसह मराठवाड्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी गर्दी केली होती. मात्र, आंदोलनामुळे बस रद्द झाल्याचे समजल्यावर प्रवाशांना घरी परतावे लागले. त्यात त्यांना त्रास सहन करावा लागला. पोलिसांच्या सूचनेनुसार बीड आणि लातूरला जाणाऱ्या सर्व एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या पुढील सूचना येईपर्यंत या गाड्या सोडण्यात येणार नाहीत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide