eknath Shinde

Maratha Reservation : उद्यापासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया होणार सुरु; मुख्यमंत्र्यांची घोषणा

1021 0

मुंबई : आज मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) नियुक्त करण्यात आलेल्या शिंदे समितीकडून प्रथम अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. शिंदे समितीने सादर केलेल्या अहवालात कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात आले आहे. उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री?
जुन्या कुणबी नोंदी तपासण्यासाठी कमिटीने एक प्रथम अहवाल आमच्याकडे सादर केला आहे . तो उद्या आम्ही मंत्रिमंडळासमोर ठेऊन त्याचा स्विकार करू. त्यानंतर पुढच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. न्यायाधीश शिंदे यांच्या समितीने जवळपास 1 कोटी 72 लाख कागदपत्रांची तपासणी केली. त्यात 11 हजार 530 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यांनी संपूर्ण सविस्तर अहवाल सादर केला आहे. फार जुने रेकॉर्ड तपासले. त्यात काही रेकॉर्ड उर्दू, मोडी लिपित सापडले आहेत. न्यायाधीश शिंदेंचा अहवाल मंत्रिमंडळात स्वीकारल्यानंतर महसूलमंत्री, प्रशासनाशी बोलून जुन्या नोंदी ज्यांच्या सापडल्या आहेत. त्यांना दाखले देण्याची प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!