आपला महाराष्ट्र

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली; उपचार घेण्यास दिला नकार

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांनी सरकारला आरक्षणासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र आरक्षण न मिळाल्यानं जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. सध्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. त्यांना बोलताना देखील त्रास होत आहे. दरम्यान त्यांना भेटण्यासाठी नांदेड येथून एक आरोग्य सेविका आली आहे. मनोज जरांगे यांची अवस्था बघून या आरोग्य सेविकेला आपले अश्रू अनावर झाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नांदेडहून एक आरोग्य सेविका थेट अंतरवाली सराटीमध्ये पोहोचली आहे. तीने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र जरांगे पाटील यांची अवस्था बघून तिला अश्रू अनावर झाले. यावेळी बोलतना आरोग्य सेविकेनं सरकारला इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. त्यांना काही झालं तर सरकारला सोडणार नाही. सरकारनं आता आरक्षणासाठी विलंब करू नये असे ही आरोग्य सेविका म्हणाली आहे.