लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीची हत्या, 22 वर्षीय बॉयफ्रेण्डला अटक

669 0

लंडन – लंडनमध्ये एका भारतीय वंशाच्या ब्रिटीश तरुणीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्कॉटलंड यार्डने एका ट्युनिशियन नागरिकाला अटक केली आहे. लंडनमधील क्लर्कनवेल भागातील आर्बर हाऊसमधील विद्यार्थिनींच्या वसतिगृहातच हल्ला करुन तिची हत्या करण्यात आली.

सविता थनवानी वय १९ असे या तरुणीचे नाव आहे. शनिवारी तिच्यावर हल्ला झाला. त्यात तिच्या मानेला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. माहेर मारुफे असे या हल्लेखोरांचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. माहेर आणि सविता दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगितले जाते.

“सविता लंडन विद्यापीठातील शिकत होती. मारुफे सवितासोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण तो विद्यार्थी नव्हता. तो ट्युनिशियाचा नागरिक असून त्याचा कोणताही निश्चित पत्ता नाही. शुक्रवारी ती प्रियकर मारुफेसोबत होती” असं या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. लंडन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!