Beed News

Beed News : आष्टी तहसीलदारांच्या गाडीला भीषण आग

446 0

बीड : बीडमधून (Beed News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये बीडच्या आष्टी तहसीलदारांच्या वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.या घटनेत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. वाहनाला आग कशी लागली? कोणी आग लावली का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आग्निशमन दलाने सध्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

काय घडले नेमके?
बीडच्या आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांच्या वाहनाला मध्यरात्री अडीच्या सुमारास अचानक आग लागली. ही गाडी तसहीलदारांच्या निवासस्थानी पार्क करण्यात आली होती. या घटनेत गाडी पूर्णपणे जळाली आहे. ही आग नेमकी कशी लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

Share This News
error: Content is protected !!