Pune News

Pune News : पुण्यातील माजी सरपंचाची इंद्रायणी नदीत उडी घेऊन आत्महत्या; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

1152 0

पुणे : मराठा आरक्षणावरून राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण पेटले आहे. लोक आरक्षणापायी आत्महत्या करताना दिसत आहेत. आता याच आरक्षणावरून पुण्यामध्ये खबळजनक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे मराठा आरक्षणावरून एका व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलले आहे. इंद्रायणी नदीत उडी मारून एका ज्येष्ठ व्यक्तीने आत्महत्या केली आहे. मराठा समाजाला आरक्षण तसेच मुलाला अनुकंपावर नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

काय घडले नेमके?
व्यंकट नर्सिंग ढापरे (60) असे आत्महत्या केलेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. ते पुण्यातील नर्हे आंबेगाव येथील रहिवाशी होते. त्यांनी आळंदी येथे आपले जीवन संपवले आहे. आज सकाळी त्यांचा मृतदेह इंद्रायणी नदी पात्रात आढळून आला. शुक्रवारी ते पुण्यातील नऱ्हे येथून आळंदी येथे आले. यानंतर त्यांनी शुक्रवारी रात्री आळंदी येथील इंद्रायणी नदीवरून सिद्धबेट बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासूनच त्यांचा शोध सुरू केला होता. अखेर आज दुपारी दोनच्या सुमारास त्या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह इंद्रायणी नदी पात्रात आढळला आहे. ढापरे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील राहणारे होते. पण ते पुण्यात स्थायिक होते. त्यांच्या मृतदेहाबरोबर एक सुसाईट नोटदेखील आढळून आली आहे.

मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. तसेच माझ्या मुलाला सरकारी अनुकंपावर नोकरी मिळाले नाही. सरकारच्या चुकीच्या कार्य पद्धतीमुळे माझा मुलगा बेकार फिरत आहे. तसेच मी स्वतः सरपंच असताना निराधारांसाठी अनुदान मिळावे, यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. मात्र त्याला यश आले नसल्याचे तसेच अनेक वेळा मराठा आंदोलनात संघर्ष केला असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे हे शासन स्वतःची खळगी भरण्यासाठी व्यस्त आहे. त्यामुळे न्याय मिळत नसल्याने निराशेपोटी आत्महत्या करत असल्याचे ढापरे यांनी आपल्या सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!