चहा आणि कॉफी (Tea Or Coffee) जगभरामध्ये सर्वाधिक सेवन केली जाणारी पेयं आहेत. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये ही दोन्ही पेयं प्यायली जातात.भारतामध्येही रोज कोट्यवधी लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. या दोन्ही पेयांमध्ये कॅफीनबरोबरच अनेक घटकांचा समावेश असतो जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात. अनेक संशोधनांमध्ये या गोष्टी समोर आल्या आहेत.
चहाप्रेमींना चहा हा फार आरोग्यदायी असतो असं वाटतं. तर कॉफीप्रेमींना कॉफी ही चहापेक्षा सरस असल्याचं वाटतं. यावरुन बऱ्याचदा वादही होतो. अनेकदा मस्करीमध्ये हा जगातील सर्वात वादग्रस्त प्रश्न असल्याचंही म्हटलं जातं. आता या वादग्रस्त प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे.
कॉफीमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. एका अभ्यासामध्ये कॉफीच्या एका कपमध्ये 1.1 ते 1.8 ग्रॅम फायबर असते. कॉफीमध्ये असणारं फायबर आणि संत्र्याच्या रसामधील फायबर सारखेच असते, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर दुसरीकडे चहामध्ये फायबर नसतं. त्यामुळेच फायबरचा पुरठवा करणाऱ्या पेयांबद्दल विचार केला तर कॉफी ही चहापेक्षा सरस आहे.