Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओ प्रकरणावर फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

477 0

मुंबई : भाजपच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा मी पुन्हा येईन हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता. मात्र काही वेळाने हा व्हिडिओ डिलीटदेखील करण्यात आला. मात्र या व्हिडिओमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अखेर या प्रकारावर खुद्द भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एखाद्याला यायचे असेल तर तो व्हिडीओ टाकून येतो का? किती हा वेडेपणा आहे’ असं म्हणत फडणवीस यांनी व्हिडीओ प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
‘देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात हाच फरक आहे. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहणार आहे. ते आमचे मुख्यमंत्री आहेत मी त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्याच पाठिशी राहणार आहे. मला कधीकधी आश्चर्य वाटतं. पहिला तर मला प्रश्न वाटतो, एखाद्याला यायचे असेल तर तो व्हिडीओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे, काही तरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे, असं म्हणत फडणवीस यांनी व्हिडिओवरून रंगलेल्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.

‘ज्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात, त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली फक्त 4 खासदार निवडून येतात, त्यांचा धसका घेतला असं म्हणणं हे बोलणं हास्यास्पद आहे. पण मी ते काय म्हटले हे ऐकलं नाही. शरद पवारांची पत्रकार परिषद मी ऐकली नाही, त्यामुळे त्याच्यावर मी कुठली प्रतिक्रिया देणार नाही’ असा टोला यावेळी फडणवीसांनी पवारांना लगावला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!