नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारतात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक सुरु आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) आयपीएलची (IPL Auction 2024) तयारी सुरू केली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामाच्या लिलावाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. 2024 च्या हंगामापूर्वी आयपीएल खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच हा लिलाव परदेशात पार पडणार आहे.
हा लिलाव 19 डिसेंबर रोजी गकेबरहा येथे होणार आहे. दहा आयपीएल संघांना 15 नोव्हेंबरपर्यंत ते कायम ठेवत असलेल्या आणि रिलीज करत असलेल्या खेळाडूंच्या याद्या सबमिट करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीस लिलाव निश्चित केला जाईल. प्रत्येक संघाकडे 2024 हंगामासाठी त्यांचा संघ तयार करण्यासाठी 100 कोटी रुपये असतील. जी मागील हंगामातील 95 कोटींच्या तुलनेत 5 कोटींनी वाढली आहे.
कोणत्या संघाकडे किती रक्कम?
पंजाब किंग्सकडे सध्या 12.20 कोटी
मुंबई इंडियन्सकडे सर्वात 50 लाख
सनरायझर्स हैदराबादकडे 6.55 कोटी
गुजरात टायटन्सकडे 4.45 कोटी
दिल्ली कॅपिटल्सकडे 4.45 कोटी
लखनौ सुपर जायंट्सकडे 3.55 कोटी
राजस्थान रॉयल्सकडे 3.35 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडे 1.75 कोटी
कोलकाता नाइट रायडर्सकडे 1.65 कोटी
चेन्नई सुपर किंग्जकडे 1.5 कोटी