Pune Suicide News

Pune Suicide News : धक्कादायक ! पुण्यातील होळकर पुलाजवळ तरुणाची आत्महत्या

1163 0

पुणे : पुण्यातून (Pune Suicide News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खडकी परिसरातील होळकर पुलाजवळ एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली असून प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. अमोल रमेश मंगळवेढेकर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस याचा तपास करत आहेत.

काय घडले नेमके?
पुण्यातील खडकी परिसरातील होळकर पुलाजवळून काही नागरिक पायी जात असताना त्यांना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पुलालगतच्या एका झाडाला तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं आहे. मृत तरुण अमोल हा शिवाजीनगरच्या वडारवाडी परिसरातील राहणारा असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत त्याला शवविच्छेदनासाठी पाठवलं आहे. स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी मृत तरुणाजवळील कागदपत्रांची तपासणी केली आहे. त्यामध्ये संबंधित तरुणाचं नाव अमोल रमेश मंगळवेढेकर असं असून तो शिवाजीनगर येथील रहिवासी असल्याचे समजत आहे. अमोलच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्याने आत्महत्या केली की त्याचा घात झाला? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!