Yavatmal Crime

Yavatmal Crime : यवतमाळ हादरलं ! अज्ञात आरोपींकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

509 0

यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal Crime) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्णीमध्ये एका ऑटोचालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. अजय तिगलवाड असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयीत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काय घडले नेमके?
कोळवण येथील अजय हा आर्णी शहरात ऑटो चालवायचा. काल रात्री मोटर सायकलने त्याच्या एका मित्राला घेऊन तो आर्णी मध्ये आला होता. याचदरम्यान पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी अजयवर धारधार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अजयला त्याच्या मित्रांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली. आरोपींना तातडीनं अटक करा या मागणीसाठी रास्तारोको देखील करण्यात आले. यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढून संशयीत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!