Territorial Army

Indian Army Recruitment : लष्कराच्या टेरिटोरियल आर्मीत होणार मेगाभरती! ‘या’ प्रकारे करा अर्ज

3162 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्कराने (Indian Army Recruitment) प्रादेशिक सैन्य अधिकारी पदासाठी भरतीचे नियोजन केले असून या साठी अर्ज मागवले आहे. लष्करात भरती होण्यासाठी इच्छुक तरुणांसाठी ही मोठी संधी असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार लष्कराच्या joinerritorialarmy.gov या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना 21 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. लष्कराने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार टेरिटोरियल आर्मी भरतीची परीक्षा ही डिसेंबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात घेतली जाणार आहे.

प्रादेशिक सैन्य भरतीसाठी कोण अर्ज करू शकतो?
21 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 42 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. मुले आणि मुली दोघेही या पदासाठी अर्ज करू शकतात.
या साठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. ही भरती लष्कराच्या प्रादेशिक सैन्यात पुरुष आणि महिला अधिकाऱ्यांसाठी आहे.
यासाठी उमेदवाराला तुम्हाला अडीच हजार रुपये फी भरावी लागणार आहे.
ज्यांचे अर्ज योग्यरित्या भरलेले असतील अशा अर्जदार उमेदवारांची प्रादेशिक आर्मी गटातील प्राथमिक मुलाखत मंडळाकडून (पीआयबी) स्क्रिनिंग म्हणजेच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
अंतिम निवडीसाठी यशस्वी उमेदवारांना सेवा निवड मंडळ (SSB) आणि वैद्यकीय मंडळाच्या मूल्यमापन चाचणी द्यावी लागणार आहे.

कसा कराल अर्ज ?
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jointerritorialarmy.gov.in ला भेट द्या.
यानंतर ‘करिअर’ वर जा – ‘अधिकारी म्हणून सामील व्हा’ – ‘नोंदणी करा’.
यानंतर आपले प्रोफाइल तयार करा आणि पोस्टसाठी अर्ज करा.
त्यानंतर संपूर्ण अर्ज भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
यानंतर अर्ज भरून झाल्यानंतर फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
फॉम सबमिट झाल्यानंतर फॉर्म डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

Share This News
error: Content is protected !!