Uddhav Thackeray and sanjay Raut

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना धक्का ! राहुल शेवाळे मानहानी प्रकरणात कोर्टाने ‘तो’ अर्ज फेटाळला

615 0

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता. या प्रकरणी आता ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांना मोठा धक्का बसला आहे. खासदार राहुल शेवाळे मानहानीप्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाकडून फेटाळण्यात आला आहे. माझगांव महानगर दंडाधिकारी कोर्टामध्ये आज सुनावणी पूर्ण झाली. यावेळी कोर्टाने हा निर्णय दिला. न्यायाधीश एस बी काळे यांनी हा निकाल दिला आहे.

काय आहे प्रकरण?
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर छापला होता. आपली बदनामी झाल्याचा आरोप करत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा केला होता.

या याचिकेविरोधात उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी या प्रकरणातून दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. सदर अर्जावर दोन्हीही पक्षांचा पूर्ण युक्तीवाद झाला होता. यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. अखेर आज न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाने फेटाळला. हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!