Chandrapur News

Chandrapur News : खळबळजनक ! घात कि अपघात ? दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या तरुणाचा अचानक आढळला मृतदेह

620 0

चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर शहरात अनेक प्राचीन वास्तू आहेत. या वास्तू बघायला दूरवरून पर्यटक येतात.मात्र, अशाच एका प्राचीन विहरीत मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. शहरातील सोनामाता मंदिराजवळ असलेल्या जुन्या काळातील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. तोल गेल्याने हा अपघात झाल्याचे समजत आहे. आकाश पाल (26) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो माता चौक येथील रहिवासी आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
माता चौक येथे राहणारा आकाश पाल हा दोन दिवसापासून बेपत्ता होता. कुटुंबियांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला पण त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळं कुटुंबियांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती. यादरम्यान आज कुटुंबियांना एका व्यक्तीने सांगितलं, एक तरुण सोमनाथ मंदिराजवळ असलेल्या प्राचीन विहिरीजवळ त्यांना दिसला होता.

कुटुंबियांना शंका आली. कुटुंबियांनी विहिरीकडे धाव घेतली. तेव्हा त्यांना मृतदेह तरंगताना दिसला.पोलीस तथा महानगर पालिका आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. कुटुंबातील कर्ता तरुण गेल्याने आकाशच्या कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide