Latur News

Latur News : लातूरमध्ये इमारतीला भीषण आग; 3 जणांचा होरपळून मृत्यू

668 0

लातूर : लातूरमधून (Latur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये एक इमारतीला लागलेल्या भीषण आगीत दोन महिलांसह एका पुरुषाचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. यानंतर त्यांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.

या दुर्घटनेत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील तीन जणांनी उड़या मारून आपला जीव वाचवला तर तिघांना दुर्दैवाने आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेत मृत पावलेल्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. हि आग नेमकी कशामुळे लागली हे देखील समजू शकलेले नाही. मात्र या आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केले होते.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide