Satara News

Satara News : हृदयविकाराच्या झटक्याने बीएसएफ जवानाचं निधन

3900 0

सातारा : सातारा (Satara News) तालुक्यातील लिंब येथील सुपुत्र, पश्चिम बंगाल येथे बीएसएफमध्ये कार्यरत असलेले जवान सुनील तुळशीदास सावंत (वय 36) यांचे हृदयविकाराच्या आजाराने दार्जिलिंग येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बीएसएफच्या जवानांनी त्यांना मानवंदना देवून रायफलच्या तीन फैरी झाडत अखेरची सलामी दिली. यावेळी शाहिद जवान सुनील सावंत यांच्या पार्थिवाला वडील तुळशीदास सावंत आणि मुलगा श्रीतेज यांनी अग्नी दिला.

सुनील सावंत यांच्याविषयी थोडक्यात माहिती
लिंब येथील सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या सुनील सावंत यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात देत सन 2010 मध्ये बीएसएफमध्ये लातूर येथे भरती झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लिंब, तर माध्यमिक शिक्षण श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह विद्यालयात झाले. उच्च माध्यमिक शिक्षण सातारा येथील शिवाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. यादरम्यानच ते बीएसएफमध्ये भरती झाले होते. सुनील सावंत यांचे नऊ वर्षांपूर्वी सारिका यांच्या बरोबर लग्न झाले असून, त्यांना एक सहा वर्षांचा मुलगा आहे. सुनील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. भाऊ सागर सावंत हेही रंगापाडा (आसाम) येथे आर्मीमध्ये सुभेदार पदावर कार्यरत आहेत.

सुनील सावंत यांना स्मशानभूमीमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले, सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, मंडलाधिकारी प्रभाकर कुलकर्णी, सातारा पंचायत समितीच्या माजी सभापती सरिता इंदलकर, सरपंच ऍड अनिल सोनमळे, अजिंक्यताराचे माजी चेअरमन सर्जेराव सावंत यांच्यासह मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी सुनील यांच्या पार्थिवास वडील तुळशीदास सावंत आणि मुलगा श्रीतेज यांनी अग्नी दिला. या घटनेमुळे लिंब गावासह आजूबाजूच्या परिसरात शोककळा पसरली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide