Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापूरात भटक्या कुत्र्यांनी माजवली दहशत; तरुणावर केला हल्ला

472 0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) सध्या भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूरात भटक्या कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे. आठवडा भरात चारशेहुन अधिक जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता कि भटक्या कुत्र्यांनी कशाप्रकारे उच्छाद मांडला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही शकता कि, एक तरुण आपल्या गाडीवरून रात्रीच्या सुमारास जाताना दिसत आहे. यादरम्यान अचानक काही भटकी कुत्री त्याच्यावर हल्ला करतात. यामुळे त्या तरुणाचा तोल जातो आणि तो खाली कोसळतो. यानंतर ती कुत्री तिकडून पळ काढतात.

यापूर्वीही अनेक भटक्या कुत्र्यांच्या दहशतीच्या घटना समोर आल्या आहेत. कुत्रे भर रस्त्यात लहानग्यांवर, वृद्धांवर, तरुणांवर हल्लाबोल करतात. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनदेखील यावर कोणतीही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide