Baba maharaj Satarkar

Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन

1730 0

मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. आज दुपारी तीन वाजता नेरुळ येथील विठ्ठल जिमखाना मंदिरात त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तसेच, उद्या (शुक्रवार, 26 ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर नेरुळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वारकरी सांप्रदायामध्ये बाबा महाराज सातारकर यांना विशेष आदर होता. त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असे.

बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर 8 महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.

Share This News
error: Content is protected !!